Navy Day : नौदल दिनानिमित्त भारतीय सशस्त्र दलाच्या प्रमुखांनी दिली वाहिली शहिदांना राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे आदरांजली
Navy Day news : भारतीय नौदलदिन रविवारी जल्लोषात संपूर्ण देशात साजरा करण्यात आला. भारतीय नौदलाने १९७१ च्या युद्धात केलेल्या कामगिरीमुळे ४ डिसेंबर रोजी नौदल दिंन साजरा केला जातो. दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार यांनी रविवारी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
(1 / 8)
भारतीय नौदलाने केलेली अतुलनीय कामगिरी आणि १९१७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान 'ऑपरेशन ट्रायडेंट' दरम्यान, पाकिस्तानच्या बंदरांवर हल्ला करत त्यांचे या युद्धात कंबरडे मोडल्याने भारताचा युद्धातील विजय सोपा झाला होता. भारतीय नौदलाच्या या कामगिरीचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. रविवारी भारतीय सशस्त्र दलाच्या उच्चपदस्थांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर आदरांजली वाहिली.(PIB)
(3 / 8)
१९७१ च्या युद्धात ऑपरेशन ट्रायडेंटमध्ये भारतीय नौदलाने कराची बंदर नष्ट करण्याच्या गौरवशाली कामगिरीचे स्मरण करून, राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे सीडीएस जनरल अनिल चौहान, आयएएफ प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी. कुमार यांनी श्रद्धांजली वाहिली, " असे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.(PIB)
(4 / 8)
"सर्व नौदल कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना नौदल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारतीय नौदलाच्या समृद्ध सागरी इतिहासाचा आम्हाला अभिमान आहे. भारतीय नौदलाने आपल्या देशाचे दृढपणे संरक्षण केले आहे आणि आव्हानात्मक काळात मानवतावादी भावनेने स्वतःला सिद्ध केले आहे," असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.(PIB)
(5 / 8)
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी कोची येथे नौदल दिनानिमित्त युद्ध स्मारकावर श्रद्धांजली वाहिली.(PTI)
(6 / 8)
"भारतीय नौदलाच्या सर्व कर्मचार्यांना नौदल दिनानिमित्त निमित्त शुभेच्छा. भारताच्या सागरी सीमांची सुरक्षा सुनिश्चित करून आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यात भारतीय नौदल पुढे आहे. भारतीय नौदलाच्या शौर्याचा, धैर्याचा, वचनबद्धतेचा आणि व्यावसायिकतेचा देशाला अभिमान आहे," असे ट्विट राजनाथ सिंह यांनी केले आहे.(ANI)
(7 / 8)
राजनाथ सिंह यांनी भारतीय नौदलाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यात नौदलाची लढाऊ सज्ज क्षमता दाखवण्यात आली आहे.(ANI)
(8 / 8)
आम्ही आमच्या राष्ट्रीय हितांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आणि भविष्यात देशाचे संरक्षण करण्यासाठी आमच्या अटल वचनबद्धतेची पुष्टी करतो. आम्ही आमच्या शूरवीरांच्या सर्वोच्च बलिदानांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या बलिदानाबाबद कृतज्ञता व्यक्त करतो," असे नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी. कुमार यांच्या हवाल्याने भारतीय नौदलाने ट्विट केले आहे.(ANI)
इतर गॅलरीज