Best Look for Garba Night: शारदीय नवरात्री सुरू होताच दांडिया-गरबा नाईट सुरू होईल. अशा परिस्थितीत गरबा नाईटला आकर्षक दिसण्यासाठी अभिनेत्रींचे हे लूक्स पहा
(1 / 7)
गरबा नाईटसाठी अभिनेत्रींचे लूक - काही दिवसांतच नवरात्रोत्सव सुरू होणार असून त्यासोबत दांडिया-गरबा नाईटही सुरू होणार आहे. गरबा-दांडिया नाईटला फक्त घागरा-चोलीच परिधान केली जात असली, तरी हा आउटफिट नसला तरी अभिनेत्रींचे हे लूक्स जरूर पहा
(2 / 7)
पारंपारिक गरबा-दांडिया लुक - पारंपारिक गरबा-दांडिया लूकमध्ये हा आउटफिट खूपच कलरफुल आहे. जर अभिनेत्री नितांशीसारखा आउटफिट कॅरी करत असाल तर सोबत पारंपारिक दागिने सुद्धा कॅरी करा.
(3 / 7)
रंगीबेरंगी लेहेंगा घाला - दांडिया-गरबा नाईटला तुम्ही रंगीबेरंगी लेहेंगा कॅरी करू शकता. अशा प्रकारच्या आउटफिटसोबत तुम्ही कंगनासारखी हेअर स्टाईल कॅरी करू शकता. या हेअरस्टाईलमध्ये तिने केसांना सोनेरी रंगाची रिबन गुंडाळली आहे.
(4 / 7)
मॉर्डन लूक - मॉडर्न लुकसाठी बांधणी किंवा गोटा पट्टी वर्क असलेला लेहेंगा कॅरी करा. आणि त्यासोबत सिल्व्हर ज्वेलरी घाला आणि काळी टिकली लावा.
(5 / 7)
दांडिया-गरबा नाईटसाठी स्टायलिश लुक - शिल्पा शेट्टीच्या या फोटोमध्ये तिने अतिशय सुंदर लेहेंगा घातला असून त्यावर आरशाचे काम करण्यात आले आहे. या लूकमध्ये अभिनेत्रीने मोकळे केस आणि साधी ज्वेलरी कॅरी केली आहे.
(6 / 7)
साधा लुक - या फोटोत माधुरी दीक्षितने हिरव्या रंगाचा लेहेंगा घातला आहे. या आउटफिटसोबत तिने मोठे कानातले आणि काही बांगड्या कॅरी केल्या आहेत. यासोबतच तिने केसांना थोडासा पफ देऊन पोनीटेलमध्ये बांधले आहे.
(7 / 7)
बांधणी लेहेंग्यात आकर्षक लुक - या मरून लेहेंग्यात कियारा अडवाणी खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने बांधणी डिझाईनच्या लेहेंगासह मागून डोरी डिझाइन असलेला ब्लाउज घातला आहे. या सिंपल लूकमध्ये अभिनेत्रीने मोठे कानातले आणि बांगड्या घातल्या आहेत.