Navratri 2024 Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार ऑक्टोबर महिन्यात नवरात्रीत सप्तमीच्या दिवशी बुधाचे संक्रमण होत आहे. परिणामी, कोणत्या राशीच्या लोकांना भाग्याची साथ लाभेल, धनलाभ होईल जाणून घ्या.
(1 / 5)
ज्योतिषशास्त्रानुसार बुध दर महिन्याला आपली राशी बदलत असतो. परिणामी, अनेक राशीच्या लोकांच्या नशिबावर परिणाम होतो. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात नवरात्री सुरू होत आहे. यावर्षी नवरात्रीत १० ऑक्टोबरला महासप्तमी आहे. त्या दिवशी बुध तूळ राशीत प्रवेश करत आहे. त्याचा प्रभाव अनेक राशींवर पडणार आहे. ( (PTI Photo) )
(2 / 5)
वर्ष २०२४ नवरात्रीत, १० ऑक्टोबरला महासप्तमीच्या दिवशी बुध तूळ राशीत प्रवेश करतो आहे. परिणामी, अनेक राशीच्या लोकांना लाभ होणार आहे, असे भाकीत ज्योतिषशास्त्रात आहेत. पाहूया, महासप्तमीपासून कोणात्या राशीच्या लोकांना सुवर्णलाभ होईल.
(3 / 5)
कन्या : या काळात तुमचे अडकलेले पैसे परत येऊ शकतात. व्यवसायात काही आकर्षक सौदे मिळू शकतात. कर्मचाऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होत राहील. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील.
(4 / 5)
कुंभ : तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकेल. खूप दिवसांपासून अडकलेले काम आता पूर्ण होईल. कमाईच्या चांगल्या संधी तुमच्या समोर येतील. कुटुंबात सुख-समृद्धी राहील. कामाला कुठेतरी जावे लागेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.
(5 / 5)
मकर - व्यवसाय लाभदायक होईल. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ चांगला राहील. कामात चांगली प्रगती दिसेल. नोकरदारांना फायदा होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना लाभ मिळेल. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील.