Navratri 2023 : कुठलाही सण-उत्सव साजरा करताना त्याचे काही नियम असतात. विशेषत: हा उत्सव देवादिकांशी जोडलेला असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. नवरात्रीचंही तसंच आहे. नवरात्रीमध्ये देवी भक्तांनी काय काळजी घ्यावी. चला पाहूया…
(1 / 11)
शारदीय नवरात्रीचा उत्सव काही दिवसांवर आला आहे. या काळात देवीच्या विविध अवतारांची पूजा केली जाते. हे व्रत करताना काही नियमांचं पालन केल्यास देवी भक्तावर प्रसन्न होते. जाणून घेऊया नेमकं काय करायला हवं आणि काय टाळायला हवं?
(2 / 11)
नवरात्रीच्या काळात तुम्ही घटस्थापना केली असेल किंवा अखंड ज्योत प्रज्वलित केली असेल तर या दिवसात घराबाहेर पडू नका. घर बंद ठेवू नका.
(3 / 11)
नवरात्रीच्या ९ दिवसांत तामसिक अन्न सेवन टाळावं. तसंच या काळात कांदा, लसूण आणि मांसाहार करू नये.
(4 / 11)
नवरात्रीच्या नऊ दिवसांत काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. असं केल्यास देवीचा कोप होऊ शकतो, असं मानलं जातं.
(5 / 11)
नवरात्रीचे व्रत पाळणाऱ्यांनी नऊ दिवस लिंबू तोडू नये किंवा कापू नये. तसं केल्यास देवी नाराज होते असं म्हटलं जातं.
(6 / 11)
नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी नऊ दिवस धान्य आणि मीठ खाऊ नये. शास्त्रानुसार गव्हाचे पीठ, वरीचे तांदूळ, साबुदाणा, शेंगदाणे, बटाटे, सुका मेवा, फळे इत्यादी खाता येतात.
(7 / 11)
विष्णु पुराणानुसार नवरात्रीच्या काळात रात्री झोपणं वर्ज्य आहे. या काळात रात्री जागर करावा. तसंच, ब्रह्मचर्य पाळावं.
(8 / 11)
नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी चमड्याचा बेल्ट, चप्पल, बूट आणि चामड्याच्या इतर वस्तू वापरू नयेत.
(9 / 11)
नवरात्रीत मुलांनी दाढी करणं शुभ मानलं जातं, परंतु नऊ दिवस उपवास करणाऱ्यांनी दाढी, मिशा आणि केस कापू नयेत.
(10 / 11)
यंदा शारदीय नवरात्रीचा उत्सव १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. हा उत्सव २३ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी दसरा हा सण साजरा केला जाणार आहे.
(11 / 11)
डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यामुळं अनुकरण करण्याआधी या क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्यावा.