Navratri 2023 : येत्या १५ ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. नवरात्रीचे ९ दिवस देवीला समर्पित असतात. या काळात काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
(1 / 10)
यंदा नवरात्री १५ ऑक्टोबरला सुरू होत असून २३ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. नवरात्रीच्या काळात लोक दुर्गा देवीच्या स्वागतासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. घर स्वच्छ केलं जातं. सजावट केली जाते. स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ मिळत नाही, असं म्हटलं जातं. त्यामुळं घटस्थापना करण्याआधी घराची स्वच्छता करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
(2 / 10)
नवरात्रीत साफसफाई करताना काही खास गोष्टी घरातून काढून टाकाव्यात. नवरात्रीच्या काळात या वस्तू घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. कोणत्या आहेत या वस्तू? जाणून घेऊया…
(3 / 10)
नवरात्रीच्या काळात दुर्गादेवी तब्बल ९ दिवस भक्तांच्या घरी वास्तव्य करते. देवीच्या स्वागतासाठी घर स्वच्छ करताना कांदा, लसूण, अंडी, मांस, मासे किंवा इतर वाईट गोष्टी घरातून काढून टाकल्या पाहिजेत. घरातील वातावरण सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे.
(4 / 10)
घरामध्ये एखादी तुटलेली मूर्ती किंवा चित्र असेल तर नवरात्र सुरू होण्याआधी घराबाहेर काढा. अशा मूर्ती किंवा चित्रांचं विसर्जन करा. असं केल्यानं वास्तुदोष होतात असं मानलं जातं.
(5 / 10)
तुटकी-फुटकी भांडी, खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा फाटलेल्या चप्पल, बूच हे सुद्धा नवरात्रीच्या आधी घरातून काढून टाकावेत. अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा पसरवतात, असं मानलं जातं.
(6 / 10)
पूजेच्या खोलीत असलेली शिळी फुले किंवा साहित्य घरातून काढून टाकावं. तसं केल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होते, असं म्हणतात.
(7 / 10)
तुमच्या घरात तुटलेलं घड्याळ असेल तर ते घराबाहेर फेकून द्या. घरात बंद घड्याळ असणं अशुभ मानलं जातं. ते प्रगतीमध्ये अडथळा आणतं आणि वाईट वेळ देखील आणतं, असं मानलं जातं.
(8 / 10)
घराच्या स्वयंपाकघरात खराब झालेली लोणची किंवा अन्नपदार्थ असतील तर ते घरात ठेवू नका. खराब अन्नपदार्थ घरात ठेवल्यास दुर्गा देवी नाराज होऊ शकते, असं म्हणतात.
(9 / 10)
घरात कुठेही अंधार असेल किंवा पुरेसा प्रकाश नसेल तर ते अशुभ मानलं जातं. नवरात्री सुरू होण्याआधी संपूर्ण घर प्रकाशानं उजळून निघेल याची काळजी घ्या. कुटुंबाच्या सुख-समृद्धीच्या दृष्टीनं घरात अंधार शुभ मानला जात नाही.
(10 / 10)
डिस्क्लेमर: या लेखातील माहिती धार्मिक मान्यतांवर आधारीत आहे. ती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यामुळं अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.