बिग बॉस 18 सध्या चर्चेत आहे. सलमान खान होस्ट करत असलेला हा शो नेहमीच सर्वांच्या आवडीचा ठरला आहे. या वादग्रस्त शोच्या प्रत्येक सीझनमध्ये प्रसिद्ध चेहरे दाखल होतात. सलमानच्या शोमध्ये केवळ स्टार्सच नाही तर क्रिकेटर्स, बॉक्सर आणि कुस्तीपटूही सहभागी झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्पर्धकांविषयी सांगणार आहोत.
क्रिकेटपटू सलिल अंकोला बिग बॉसच्या पहिल्या सिझनमध्ये सहभागी झाला होता. काही कायदेशीर अडचणींमुळे त्याला शो सोडावा लागला होता.
माजी भारतीय क्रिकेटर आणि टीव्ही होस्ट नवज्योत सिंग सिद्धू बिग बॉस ६ मध्ये दिसले होते. मात्र, राजकीय कामामुळे त्यांना शो मध्येच सोडावा लागला. सिद्धूला कपिल शर्माच्या शोमध्ये जज म्हणूनही बराच काळ दिसले होते.
कुस्तीपटू संग्राम सिंहने बिग बॉस ७ मध्ये भाग घेतला होता. तो शोच्या फायनल स्पर्धकांपैकी एक होता.
माजी क्रिकेटर विनोद कांबळी बिग बॉसच्या तिसऱ्या सिझनमध्ये दिसले होते. त्याच्या मनमिळाऊ स्वभावाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
क्रिकेटपटू श्रीशांत बिग बॉस १२ चा फर्स्ट रनर अप ठरला होता. शोमध्ये, तो केवळ त्याच्या खेळासाठीच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील बराच चर्चेत राहीला होता.