आपण येथे अशाच काही गोलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी महान खेळाडूंच्या गोलंदाजीची ॲक्शन कॉपी करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ माजवली आहे.
ॲडम झाम्पा- ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ॲडम झाम्पानेही कॉपी केलेल्या गोलंदाजीच्या अॅक्शनने बरेच यश मिळवले. झाम्पाने ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नच्या ॲक्शनची नक्कल केली असून तो या गोलंदाजीच्या ॲक्शनमध्ये बऱ्यापैकी यशस्वी ठरला आहे.
मथिषा पाथिराना- श्रीलंकेचा युवा स्टार वेगवान गोलंदाजही त्याच्या ॲक्शनमुळे चर्चेत होता. पाथीरानाने श्रीलंकेचा माजी दिग्गज लसिथ मलिंगाच्या अॅक्शनची नक्कल केली आहे. मलिंगाच्या ॲक्शनची कॉपी करणंही खूप अवघड आहे, पण पाथिरानानं त्याच्या ॲक्शनची नक्कल चांगली केली. आयपीएलमध्ये आपला ठसा उमटवणारा पाथिराना आता प्रसिद्ध गोलंदाज बनला आहे.
संदीप लामिछाने- नेपाळचा स्टार खेळाडू संदीप लामिछानेची गोलंदाजी अॅक्शन अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खानशी मिळतेजुळती आहे. लामिछानेची गोलंदाजी ॲक्शन पाहून तुम्हीही म्हणाल की तो रशीद खानसारखाच आहे.
नवीन उल हक- नवीन उल हक गोलंदाजीची ॲक्शन कॉपी करण्यात माहिर ठरला. अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजाने भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या ॲक्शनची नक्कल केली. बुमराहच्या ॲक्शनसह गोलंदाजी करणे हे खूप अवघड काम आहे, पण नवीनने हे काम सुंदरपणे पार पाडले. सध्या नवीन हा क्रिकेट जगतातील प्रसिद्ध वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. नवीन बुमराहची ॲक्शन केवळ प्रसिद्धच नाही तर प्रभावीही आहे.