शारदीय नवरात्रोत्सवाला ३ ऑक्टोबर २०२४ पासून सुरुवात होत आहे. ११ ऑक्टोबरला नवमी तिथी आणि दुसऱ्या दिवशी १२ ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे.
या ९ दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या ९ रूपांची पूजा केली जाते. शारदीय नवरात्रीची भाविकांना सर्वाधिक प्रतीक्षा असते. घटस्थापना करून मंडपात दुर्गा मातेच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. पितृ पक्षानंतर नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस हे फार महत्वाचे असतात.
( (फोटो सौजन्य एएफपी))नवरात्रीमध्ये घरी दुर्गा मातेचे आवाहन करण्यापूर्वी शास्त्रात सांगितलेल्या काही गोष्टी करा. तरच तुम्हाला देवीचा पूर्ण आशीर्वाद मिळेल .
(AFP)नवरात्रीपूर्वी घराची संपूर्ण स्वच्छता करा. घरात मटण, मद्य, लसूण, कांदा इत्यादी असतील तर ते काढून टाकावे. ज्या घरात घटस्थापना केली जाणार आहे, त्या घराच्या शुद्धतेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा दुर्गा मातेची नाराजी जीवनात विनाश घडवून आणू शकते.
तुटलेली भांडी आणि जुने कपडे घरातून काढून टाका. यामुळे घरात नकारात्मकता निर्माण होते. ज्यामुळे घरात गरिबी, आजारपण आणि इतर त्रास वाढतो. दुर्गा मातेचे वास्तव्य केवळ स्वच्छ ठिकाणीच असते.
अनेक जण मंदिरात माचिस, अगरबत्तीचे तुकडे, जळलेली अगरबत्ती इत्यादी ठेवतात. हे कधीच करू नका. देवी-देवता नाराज होतात. निर्माल्य गोळा करून वेळोवेळी विसर्जित करा किंवा पाण्यात वाहून टाका.
(Instagram )