Mumbai Boat Accident: स्पीड बोडची धडक अन् अनेक कुटुंब उद्ध्वस्त; मुंबई बोट दुर्घटनेतील फोटो पाहून अनेकांचे डोळे पाणावले!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Boat Accident: स्पीड बोडची धडक अन् अनेक कुटुंब उद्ध्वस्त; मुंबई बोट दुर्घटनेतील फोटो पाहून अनेकांचे डोळे पाणावले!

Mumbai Boat Accident: स्पीड बोडची धडक अन् अनेक कुटुंब उद्ध्वस्त; मुंबई बोट दुर्घटनेतील फोटो पाहून अनेकांचे डोळे पाणावले!

Mumbai Boat Accident: स्पीड बोडची धडक अन् अनेक कुटुंब उद्ध्वस्त; मुंबई बोट दुर्घटनेतील फोटो पाहून अनेकांचे डोळे पाणावले!

Dec 19, 2024 02:21 AM IST
  • twitter
  • twitter
  • Mumbai Boat Capsized: मुंबईतील गेट ऑफ वे इंडियाजवळ स्पीड बोटच्या धडकेनंतर प्रवासी बोट समुद्रात उलटली. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटा लेणीकडे जात असताना भारतीय नौदलाची बोट नीलकमल या प्रवासी नौकेला धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर, १०१ जणांचा वाचवण्यात यश आले आहे. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. 
twitterfacebook
share
(1 / 7)

नीलकमल असे समुद्रात बुडालेल्या बोटीचे नाव आहे. ही बोट दुपारी चार वाजताच्या सुमारास मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाहून प्रसिद्ध पर्यटनस्थळ एलिफंटा आयलँडकडे जात होती. त्यावेळी भारतीय नौदलाच्या बोटीने त्यांना धडकली. कोणाला काही समजायच्या आत नीलकमल बोट समुद्रात उलटली.
twitterfacebook
share
(2 / 7)

समुद्रात बोट उलटल्याचे समजताच ताबडतोब बचावकार्य सुरू करण्यात आले. नौदलाची चार हेलिकॉप्टर्स, तटरक्षक दलाची एक बोट आणि सागरी पोलिसांच्या तीन नौका आणि स्थानिक मच्छिमार बचावकार्यात सहभागी झाले. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने स्पीडबोट नियंत्रणाबाहेर गेली, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली, असे नौदलाकडून स्पष्ट करण्यात आले.
twitterfacebook
share
(3 / 7)

या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नौदलाच्या तीन जवानांचा समावेश आहे. तर, १०१ जणांना वाचवण्यात आले. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर  नेव्ही डॉकयार्ड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
twitterfacebook
share
(4 / 7)

या घटनेत मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच या घटनेचा पोलीस आणि भारतीय नौदल संयुक्तपणे तपास करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
twitterfacebook
share
(5 / 7)

या व्हिडीओमध्ये नौदलाची स्पीड बोट फेऱ्या मारताना दिसत आहे. त्यानंतर स्पीड बोड यु-टर्न घेते आणि प्रवासी बोटीच्या दिशेने येते. शेवटच्या क्षणी दुसरीकडे वळण्याचा प्रयत्न होतो, पण दोन्ही बोटीची धडक होते. 
twitterfacebook
share
(6 / 7)

(7 / 7)
या घटनेत मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच या घटनेचा पोलीस आणि भारतीय नौदल संयुक्तपणे तपास करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.(Hindustan Times)
मुंबईतील बोट दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. मुंबईतील बोट दुर्घटना दुःखद आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी या दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकाच्या कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीतून दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली.
twitterfacebook
share
(8 / 7)
मुंबईतील बोट दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. मुंबईतील बोट दुर्घटना दुःखद आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी या दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकाच्या कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीतून दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली.(DPR PMO)
इतर गॅलरीज