तणाव हा सर्व काम करणाऱ्या मातांच्या आयुष्यातील सर्वात सामान्य भाग आहे. काम, घर आणि मूल आणि नवऱ्याची एकत्रित काळजी यामुळे नोकरी करणाऱ्या मातांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होतो. एक वर्किंग आई म्हणून, आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आव्हानात्मक असू शकते, विशेषत: जेव्हा आपण काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असाल," असे मानस्थळीच्या संस्थापक- संचालक आणि वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ज्योती कपूर म्हणतात.
(Pixabay)१. स्वत: ची काळजी घेण्यासाठी वेळ काढा: आपल्या वेळापत्रकात अशा अॅक्टिव्हिटीसाठी वेळ काढा जे तुम्हाला आराम आणि रिचार्ज करण्यास मदत करतात. हे पुस्तक वाचण्यापासून ते वॉर्म बाथ किंवा योगाभ्यास किंवा व्यायाम करण्यापर्यंत काहीही असू शकते.
(Pixabay)२. सीमा निश्चित करा: तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ मिळेल याची खात्री करण्यासाठी तुमचा एम्प्लॉयर, सहकारी आणि कुटुंबातील सदस्यांसह सीमा निश्चित करणे महत्वाचे आहे. याचा अर्थ अतिरिक्त कामाच्या जबाबदाऱ्यांना 'नाही' म्हणणे किंवा इतरांवर कामे सोपविणे असा होऊ शकतो.
(Pexels)३. कनेक्ट रहा: आपल्यासमोरील आव्हाने समजून घेणाऱ्या इतर काम करणाऱ्या मातांशी संपर्क साधल्यास आपल्याला कमी एकटे वाटण्यास मदत होते. समर्थन गटात सामील होण्याचा किंवा सोशल मीडिया किंवा ऑनलाइन फोरमद्वारे इतर मातांशी संपर्क साधण्याचा विचार करा.
(Pixabay)४. ब्रेक घ्याः दिवसभर नियमित ब्रेक घेणे महत्वाचे आहे, विशेषत: जर तुम्ही घरून काम करत असाल तर. उठा आणि ताणून घ्या, फिरायला जा किंवा ध्यान करण्यासाठी काही मिनिटे काढा.
(Pixabay)५. माइंडफुलनेसचा सराव करा: तणावाच्या काळातही माइंडफुलनेस आपल्याला प्रेझेंट आणि एकाग्र राहण्यास मदत करू शकते. आपल्या डेली रुटीनमध्ये डीप ब्रीदिंग, ध्यान किंवा योग यासारख्या माइंडफुलनेस पद्धतींचा समावेश करण्याचा विचार करा.