कांद्याचे असतात हे पाच प्रकार, या प्रकारचा कांदा असतो चविष्ट आणि महागसुद्धा!
- National Onion Day 2022 : सध्या जगभरात वाढत्या लोकसंख्येमुळं आहारात कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कांद्याच्या किंमती सतत कमी-जास्त होत असल्यानं त्याची नेहमीच चर्चा होत असते. दरवर्षी २७ जूनला राष्ट्रीय कांदा दिवस साजरा केला जातो. त्यामुळं कांद्याविषयी काही खास गोष्टी आणि त्याचे फायदे जाणून घेऊयात.
(1 / 7)
नॅशनल ओनियन असोसिएशनने संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी २७ जून २०१९ रोजी यापुढे २७ जून हा दिवस राष्ट्रीय कांदा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यामुळं आज कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी राष्ट्रीय कांदा दिवस साजरा करत आहे.(HT)
(2 / 7)
आज कांदा उत्पादनाशी संबंधित आणि त्याच्या विक्री व्यवस्थेशी संबंधित लोकांनी आज देशभर कांदा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.(HT)
(3 / 7)
पांढरा कांदा, पिवळा कांदा, लाल कांदा आणि गुलाबी रंगाचा कांदा, असे कांद्याचे पाच प्रकार असल्याचं सांगितलं जातं. यात गुलाबी रंगाच्या कांद्याला बाजारात सर्वाधिक मागणी असते. कारण हा कांदा खायला अतिशय चविष्ट आणि आरोग्यासाठी गुणकारी असल्यानं त्यामुळं हा कांदाची किंमत बाजारात सर्वात जास्त असते.(HT)
(4 / 7)
डोळ्यांचे आणि ह्रदयाच्या आजारावर मात करण्यासाठी कांद्याचं सेवन करणं अतिशय फायदेशीर असल्याचं मानलं जातं. याशिवाय ज्या लोकांना लठ्ठपणाची आणि रक्तदाबाची समस्या आहे त्यांनीदेखील कांद्याचं सेवन करायला हवं, असा सल्ला नेहमीच वैद्यकीय जाणकार देत असतात.(HT)
(5 / 7)
आहारात कांद्याचा समावेश केल्यानं व्यक्तीची अन्नपचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याशिवाय पोटातील जळजळ कमी होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.(HT)
(6 / 7)
कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर आणि फ्लेव्होनॉइड्स अशा अनेक पोषकतत्वांचा समावेश असल्यानं कांद्याचं सेवन करणं हे आरोग्यासाठी गुणकारी मानलं जातं.(HT)
(7 / 7)
कांद्याचा उपयोग भजी, सँडविच, बर्गर आणि अशा अनेक प्रसिद्ध भाज्यांमध्ये केला जातो. त्यामुळं अन्नपदार्थांची चव तर वाढतेच याशिवाय त्यामुळं विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मिळते.(HT)
इतर गॅलरीज