सातारा सैनिक स्कूलचा विद्यार्थी आणि शेतकरी पुत्र शोबीत गुप्ता हा यावर्षी राष्ट्रपती सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. यावेळी गेली तीन वर्षे प्रबोधिनीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या छात्रांनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील ‘अंतिम’ पाऊल ओलांडत जल्लोष केला. या संचलनाला चेतक हेलिकॉप्टर आणि सुखोई या लढाऊ विमानांनी दिलेली सलामी हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सोहळ्याचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात ‘एनडीए’च्या १४६व्या तुकडीत बटालियन कॅडेट कॅप्टन शोभित गुप्ता याने एकूण गुणवत्तेच्या क्रमवारीत प्रथम राहिल्याबद्दल राष्ट्रपतींचे सुवर्णपदक जिंकले.
अकादमी कॅडेट ऍडज्युटंट माणिक तरुण याने एकूण गुणवत्तेच्या क्रमवारीत द्वितीय राहिल्याबद्दल राष्ट्रपतींचे रौप्य पदक जिंकले. तर अन्नी नेहराने एकूण गुणवत्तेच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर राहिल्याबद्दल राष्ट्रपतींचे कांस्य पदक पटकावले. तर गोल्फ स्क्वाड्रन प्रतिष्ठित 'चीफ ऑफ स्टाफ बॅनर' चे मानकरी ठरले.
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले, जगात मोठ्या प्रमाणात अशांतता पसरत चालली आहे. काहिंनथिकानी लष्करी संघर्ष देखील सुरू आहेत. येणारा काळ हा आव्हानात्मक असणार आहे. तसेच पारंपरिक युद्ध पद्धत ही बदलत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधितून बाहेर पडणाऱ्या भविष्यातील लष्करी अधिकाऱ्यांना या बदलत्या युद्ध पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. आणि त्या दृष्टीने देशासमोर येणाऱ्या आव्हानांचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४७ व्या कोर्सच्या पासिंग आऊट परेड मध्ये एकूण १२६५ कॅडेट्स सहभागी झाले होते, ज्यामध्ये ३३७ कॅडेट हे पास आऊट झालर. या अभ्यासक्रमात १० मित्र राष्ट्रांचे १९ कॅडेट देखील पास आऊट झाले. यात भूतान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार आणि मालदीव यासारख्या देशांचा समावेश आहे.
आज पास आऊट झालेल्या ३३७ कॅडेट पैकी १९९ आर्मी कॅडेट्स, ३८ नेव्हल कॅडेट्स आणि १०० एअर फोर्स कॅडेट्सचा समावेश आहे. सध्या प्रशिक्षणाच्या तिसऱ्या आणि चौथ्या टर्ममध्ये असलेल्या २४ महिला कॅडेट्सच्या तुकडीनेही या परेडमध्ये भाग घेतला.
राष्ट्रपती रौप्य पदकाचा मानकरी ठरलेला माणिक तुरण हा मूळचा हरियाणा येथील असून त्याने त्याचे शिक्षण सैनिक स्कूल डेहराडून येथून पूर्ण केले. त्याचे वडील हे शिक्षक असून आई देखील शिक्षिका आहे. त्याला नौदलात जायचे आहे. त्याचे आजोबा हे लष्करात होते. त्यांच्या पासून त्याला सशस्त्र दलात भरती होण्याची प्रेरणा मिळाली. कांस्य पदकाचा मानकरी ठरलेला अन्नी नेहरा याने त्याचे शालेय शिक्षण हे सैनिक स्कूल बेळगाव येथून पूर्ण केले. या ठिकाणी त्याला लष्करात येण्याची प्रेरणा मिळाली. येथे सहा वर्ष त्याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रवेश परीक्षेची तयारी केली. या जोरावर त्याने पहिल्याच प्रयत्नात एन डी ए मध्ये प्रवेश मिळवला. त्याचे लष्करात जाण्याचे स्वप्न असून पुढील लष्करी प्रशिक्षणासाठी तो राष्ट्रीय रक्षा अकडमित जाणार आहे.