सूर्यमालेतील गुरु हा ग्रह सर्वात मोठा आणि भव्य आहे. या ग्रहांची अनेक वैशिष्ट्य आहेत. याच्या करड्या पट्ट्या या ग्रहाचे आकर्षण आहे. नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोपने गुरु ग्रहाची आकर्षक छायाचित्रे टिपली आहेत. ही छायाचित्रे नासाने जाहीर केली असून गुरूच्या सतत बदलणाऱ्या हवामानाची माहिती हे छायाचित्र उघड करत आहेत.
(NASA, ESA, STScI, Amy Simon (NASA-GSFC)नासाने जाहीर केलेल्या फोटोंमध्ये गुरुचा प्रसिद्ध ग्रेट रेड स्पॉट दिसत आहे, एक चक्रिय वादळ प्रणाली या ग्रहाभोवती आहे. यामुळे या ग्रहावर रेड स्पॉट दिसतात. याला रेड स्पॉट ज्युनियर म्हणून संबोधले जाते. हे अँटीसायक्लोन, १९९९८ आणि २००० मध्ये वादळांच्या विलीनीकरणामुळे तयार झाले. हे गुरु ग्रहाचे एक रहस्य मानले जाते.
(NASA)गुरु ग्रहाच्या दक्षिण गोलार्धात मोठ्या प्रमाणात वादळे असून लाल चक्रीवादळ गुरूच्या वातावरणात दिसतात. ही वादळे, विरुद्ध दिशेने फिरतांना दिसतात,
(NASA)वादळांचे उलटे परिभ्रमण एक वेगळा प्रभाव निर्माण करतात, ज्यामुळे ते वेगाने फिरतांना दिसतात. हा देखावा मंत्रमुग्ध करणारा आणि अभ्यासकांना चकित करणारा आहे. नासाच्या आऊटर प्लॅनेट ॲटमॉस्फिअर्स लेगसी प्रोग्रामचे प्रमुख, एमी सायमन नोंदवतात की गुरूवरील असंख्य वादळे आणि ढगांमुळे हा ग्रह सूर्यमालेत वेगळा ठरतो.

(NASA)गुरूच्या सर्वात जवळील गॅलिलीयन चंद्र देखील टिपण्यात आला आहे. गुरूच्या या चंद्राचा आकार कमी असूनही, आयओ हे आपल्या सूर्यमालेतील सर्वात ज्वालामुखीय सक्रिय चंद्र आहे. १९७९ मध्ये व्हॉयेजर १ या उपग्रहाणे सुरू केलेल्या शोधाचा वारसा पुढे चालू ठेवत हबल टेलिस्कोपने या चंद्राच्या ज्वालामुखीच्या भूभागाच्या गुंतागुंतीच्या तपशीलांचे फोटो टिपले आहेत.
(NASA)