गेल्या काही वर्षांत राजकारण्यांवर अनेक बायोपिक चित्रपट बनले आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावांचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटांबद्दल आणि त्यांना बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद मिळाला.
थलायवी: 'थलायवी' हा चित्रपट २०२१साली प्रदर्शित झाला होता आणि हा चित्रपट राजकारणी जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटात कंगना रनौतने मुख्य भूमिका साकारली होती आणि १०० कोटी रुपये खर्चून बनलेला हा चित्रपट जेमतेम ८ कोटींची कमाई करू शकला. या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा झाली, पण तो फार चालू शकला नाही.
पीएम नरेंद्र मोदी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित झाला होता. ओमंग कुमार दिग्दर्शित, या चित्रपटाचे बजेट ८ कोटी रुपये होते आणि त्याला IMDb वर १० पैकी फक्त ३ रेटिंग मिळाले. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण २८ कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटात विवेक ओबेरॉयने पीएम मोदींची भूमिका साकारली होती.
मैं अटल हूं: २०२४साली प्रदर्शित झालेल्या 'मैं अटल हूं' या बायोपिक चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांची भूमिका साकारली होती. रवी जाधव दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट २० कोटी रुपये होते आणि बॉक्स ऑफिसवर केवळ १२ कोटींची कमाई झाली. चित्रपटाला IMDb वर १० पैकी ७ रेटिंग मिळाले आहे.
ठाकरे: २०१९मध्येच बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारताना दिसला होता. अंदाजे ३० कोटी रुपये खर्चून बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केले होते आणि या चित्रपटाने जगभरात २५ कोटींचा व्यवसाय केला होता. चित्रपटाला IMDb वर १० पैकी ५ रेट केले गेले आहे.