वनराज आंदेकर यांच्या हत्येमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. वनराज आंदेकर यांच्या दोन्ही बहिणींना पोलिसांनी अटक केली आहे. वनराजचा खून करण्यासाठी त्यांनी व मेहुण्याने प्लॅन केला होता. संपत्तीच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. वनराज यांच्या खुनामुळे परिसरात दहशत असून नाना पेठेतील सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
वनराज आंदेकर यांच्या करकर्त्यांनी घरासमोर मोठी गर्दी केली आहे. परिस्थिती हातळण्यासाठी या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. वनराज आंदेकरच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. तसेच पोलिस सुरक्षेत त्याचा मृतदेह हा घरी आणण्यात आला आहे.
नाना पेठेत चौका चौकात भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले आहे. तर नागरिकांनी वनराज आंदेकर यांच्या घरासमोर गर्दी केली आहे.
कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून वनराज आंदेकरचा खून केकरण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून बहिणी आणि वनराजच्या वडिलांसोबत प्रॉपर्टीवरून वाद सुरू होते. याच वादातून जयंत आणि गणेश कोमकर यांनी सोमनाथ गायकवाडच्या मदतीने वनराजची हत्या केली.
वनराज आंदेकरला त्याच्यावर हल्ला होऊ शकतो, याची जाणीव होती. त्यामुळे तो त्याच्या मुलांच्या टोळक्यात राहत होता. मात्र, काल त्याच्या सोबत त्याचे मुले सोबत नव्हती. ही संधी साधून आरोपींनी वनराज आंदेकरवर हल्ला केला.