बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक काळ असा होता जेव्हा इच्छाधारी नाग आणि नागिनीवर आधारित अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते. लोकांना इच्छाधारी नाग आणि नागिनीची प्रेम कथा, तसेच ते माणसांचा घेणारा बदला अशा कथा पाहायला प्रेक्षकांना विशेष आवडायच्या. अनेक मालिका देखील अशा होत्या ज्यामध्ये नागिन दाखवण्यात आली होती. आज नागपंचमीच्या निमित्ताने चला पाहूया नाग-नागिनीवर आधारित चित्रपट...
बॉलिवूडमधील नाग-नागिनीवर आधारित पहिला चित्रपट १९५४ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन नंदलाल जसवंत यांनी केले होते. या चित्रपटाच वैजयंती माला आणि प्रदीप कुमार दिसले होते.
१९७६ साली म्हणजेच २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या नागिन या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार कोहली यांनी केले होते. चित्रपटात दाखवण्यात आले होते की नागिन कशाप्रकारे नागाच्या मृत्यूचा बदला घेते. चित्रपटात सुनील दत्त, फिरोज खान, विनोद मेहरा, जीतेंद्र, रेखा, मुमताज, रीना रॉय, योगिता बाली, संजय खान दिसले होते.
श्रीदेवीचा नागिन अवतार आजपर्यंत कोणी विसरु शकले नाही. तिचा हा लूक तुफान चर्चेत होता. दिग्दर्शक हरमेश मल्होत्राच्या १९८६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात श्रीदेवी, ऋषि कपूर आणि अमरीश पुरी दिसले होते.
नागिन चित्रपटाला मिळाल्या यशानंतर हरमेश मल्होत्रा यांनी नागिन चित्रपटाचा सीक्वल काढला. या चित्रपटाचे नाव निगाहें असून १९८९मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात श्रीदेवीसोबत अनुपम खेर, सनी देओल दिसले होते.
मिनाक्षी शेषाद्री आणि नितीश भारद्वाज यांचा नाचे नागिन गली गली हा चित्रपट १९८९ साली प्रदर्शित झाला होता.