PM Narendra Modi In Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पुण्यात दाखल झाले आहे.
(HT)मणिपूर हिंसाचार आणि बलात्काराच्या प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि युवक क्रांती दलाने मोदींच्या पुणे दौऱ्याचा विरोध करायला सुरुवात केली आहे.
(HT)सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या नेतृत्त्वाखाली पुण्यातील मंडई परिसरात आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी कसब्यातील कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, अरविंद शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते आंदोलनात सहभागी झाले.
(HT)पंतप्रधान मोदींनी पुण्याचा नाही तर मणिपुरचा दौरा करायला हवा होता, असं वक्तव्य आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे. तिथं माणसं मरत आहे, महिलांवर बलात्कार होतायंत, त्यावर पीएम मोदी गप्प का आहेत?, असाही सवाल आमदार धंगेकर यांनी केला आहे.
(HT)युवक क्रांती दलाचे सचिन पांडूळे आणि आप्पा अनारसे यांना अटक केल्यानंतर युक्रांदचे संस्थापक कुमार सप्तर्षी यांनी मंडईत आंदोलन करत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
(HT)हिटलर यायचा तेव्हा असंच विरोधकांना नोटीसा जारी करत अटक करण्यात यायची. आमच्याही कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्री अडवून ठेवलं आहे. आता निषेध झाला नाही तर पुढे काहीही शिल्लक राहणार नसल्याचं सांगत सप्तर्षी यांनी मोदींवर जोरदार प्रहार केला आहे.
(HT)