शरीर निरोगी ठेवायचे असेल, तर आहारात पालेभाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. विशेषतः हिवाळ्यात या ७ प्रकारच्या हिरव्या पालेभाज्यांचा आपल्या आहारात नक्कीच समावेश करावा. या भाज्या तुमचे हृदय हेल्दी तर ठेवतातच, शिवाय शरीरातील रक्ताचे प्रमाणही वाढवतात आणि या भाज्या अँटी-ऑक्सिडेंटने भरपूर असतात. जाणून घ्या या कोणत्या पालेभाज्या आहेत…
चाकवत ही पालेभाजी शरीरात रक्त वाढवण्यास मदत करते. यामध्ये लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर फायबरमुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते.
हिवाळ्यात बाजारात शेपूची भाजी अगदी ताजी मिळते. ही भाजी खाल्ल्याने पोटातील गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. तसेच, या पानांमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे व्हिटॅमिन डी हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी सकस आहार हवा असेल तर शेपू अवश्य खा. त्यात खूप कमी कॅलरी आणि मुबलक प्रमाणात पोषक तत्वे असतात.
मोहरीची पालेभाजी हिवाळ्यात आवर्जून खाल्लीच पाहिजे. मोहरीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, के आणि लोह मुबलक प्रमाणात असते. याशिवाय त्यात अँटिऑक्सिडंट्सही भरपूर असतात, ज्यामुळे डोळे मजबूत होतात. त्यामुळे आपल्या आहारात मोहरीची पालेभाजी असलीच पाहिजे.
हिवाळ्याच्या दिवसांत आहारात मेथीच्या पानांचा समावेश जरूर करावा. ही भाजी केवळ मधुमेहाच्या रुग्णांसाठीच फायदेशीर नाही, तर हृदयरोगींसाठीही फायदेशीर आहे. यासोबतच मेथीची पाने रक्तदाबापासून ते पचनापर्यंत सर्व काही ठीक करण्यास मदत करतात.
चवळीच्या पालेभाजीचे अनेक फायदे आहेत. ज्या लोकांना हिवाळ्यात बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी चवळीची पालेभाजी जरूर खावी. ही भाजी आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
पालकाचे फायदे सर्वांना माहीत आहेत. कॅल्शियम आणि लोहासोबतच पालक हे प्रथिनांचाही स्रोत आहे. सर्वांगीण आरोग्य राखण्यासाठी पालक आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे.