मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Munjya Actor: ‘मुंज्या’ चित्रपटामध्ये झळकलेल्या अभिनेत्याला खऱ्या आयुष्यात तृतीयपंथी समजू लागले होते लोक!

Munjya Actor: ‘मुंज्या’ चित्रपटामध्ये झळकलेल्या अभिनेत्याला खऱ्या आयुष्यात तृतीयपंथी समजू लागले होते लोक!

Jul 03, 2024 08:49 PM IST
  • twitter
  • twitter
Munjya Actor Abhay Verma: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुंज्या’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली असून, या चित्रपटाला लोकांकडून खूप पसंती मिळत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अभयने त्याच्या खऱ्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला आहे, जो तुम्हाला भावूक करेल.
'मुंज्या' चित्रपटातील मुख्य अभिनेता अभय वर्माने पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत काम केले आहे. हा चित्रपट लोकांना खूप आवडला आहे. पण, या चित्रपटातील मुख्य अभिनेता अभय वर्माचा इथवरचा प्रवास खूप कठीण होता. अभयने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील एक अतिशय वाईट घटना सांगितली आहे.
share
(1 / 5)

२०२३मध्ये रिलीज झालेल्या 'सफेद' या चित्रपटात अभयने ट्रान्सजेंडरची अर्थात तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेशी जुळवून घेण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती. पण, ही व्यक्तिरेखा साकारताना तो अडचणीत येऊ शकतो, असा विचारही त्याने केला नसेल.
share
(2 / 5)

या घटनेची माहिती देताना त्याने सांगितले की, ‘एके दिवशी मी रात्री हॉटेलमध्ये परतत असताना काही मद्यधुंद मुले मला भेटली. मी ट्रान्सजेंडर आहे असे समजून त्या मुलांनी मला थांबवले आणि माझ्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. जेव्हा मी त्यांना सांगितले की, मी ट्रान्सजेंडर नाही आणि चित्रपटाची तयारी करत आहे, तेव्हा त्यांनी मला जाऊ दिले.’
share
(3 / 5)

अभयने असेही सांगितले की, जेव्हा तो ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत लोकांना भेटला, तेव्हा त्यांनी त्याचा अजिबात आदर केला नाही, उलट त्याला अनेक दुषणे दिली. अभयची अभिनय कारकीर्द सोपी नव्हती. पण, आता ‘मुंज्या’ हिट झाल्यानंतर त्याला खूप प्रसिद्धी मिळत आहे.
share
(4 / 5)

अभयने संजय लीला भन्साळी यांच्या 'बैरागी' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, त्यानंतर त्याला 'फॅमिली मॅन २'मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती.
share
(5 / 5)

इतर गॅलरीज