Mumbai weather update : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात बदल होत आहे. गेल्या आठवड्यात थंडीमुळे मुंबईकर सुखावले होते. मात्र, आता कमाल तापमानात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मुंबईचा पारा हा ३६ ते ३७ डिग्री सेल्सिअसवर पोहचला आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
(1 / 5)
राज्याच्या तपमनात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. मुंबईत देखील कमाल तापमानात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. (Pixabay )
(2 / 5)
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये कमाल तापमानात वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उष्णता आणि दमट वातावरण असा दुहेरी मारा मुंबईकर सहन करत आहेत.
(3 / 5)
मुंबईत मार्च महिन्याच्या सुरुवातीस मुंबईकरांनी थंडी अनुभवली होती. यामुळे काही दिवस उकड्यापासून दिलासा मिळाला होता. (HT_PRINT)
(4 / 5)
मात्र, मुंबईत आता पुन्हा उष्णता मान वाढले आहे. पुढील दोन-तीन दिवसांत मुंबईच्या कमाल तापमान वाढ झाली असून पारा हा ३५-३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे.
(5 / 5)
सध्या देशात हवामानात मोठे बदल होत आहे. उत्तर छत्तीसगड, तेलंगणा ते उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्याच्या तापमानात बदल झाले आहेत. (REUTERS)
(6 / 5)
मुंबईत या मुळे काही दिवसांत उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत कुलाबा केंद्रात बुधवारी ३०.६, तर सांताक्रुझ केंद्रात ३१.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.(PTI)