मुंबईत दडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई शहर व उपनगरांत शनिवारी पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, रविवारी आणि सोमवारी मुंबईत अतिमुळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून यलो अलर्ट जारी केला आहे.
आज मुंबईसह पालघर आणि ठाण्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबईला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
(Hindustan Times)मुंबईत सोमवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अलर्ट हवामान विभागणे दिला आहे.
(Hindustan Times)मुंबईत शनिवारी संपूर्ण दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. मुंबई शहर तसेच उपनगरांत रविवारी सकाळ पासून काही भागात हलक्या सरी कोसळत होत्या. तर उद्या सोमवारी पावसाचा जोर वाढणार आहे.
(Hindustan Times)पावसामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली असून तापमानात देखील घट झाली आहे. कुलाबा केंद्रात २५ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
(PTI)मुंबईसह राज्यातील विदर्भ व कोकणात पावसाचा जोर पुढील काही दिवसांत वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. कोकणात अतिमुसळधार पावसाची, तर विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
(Hindustan Times)