देशाच्या उत्तर भागात कडाक्याची थंडी पडत आहे. तसेच पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झालेली हवेची चक्रीय स्थिती व बंगालच्या उपसागरावरील प्रती चक्रिय वाऱ्यांमुळे राज्यात मोठ्या आद्रता येत आहे. दरम्यान, यामुळे राज्यात बहुतांश भागात कमाल तापमानात घट झाली आहे. राज्याची आर्थिक राजधानी मुंबईदेखील गारठली आहे.
(HT_PRINT)सकाळी आणि संध्याकाळी कमाल तापमानात मुंबईत मोठी घट जाणवत आहे. सोमवारी मुंबईचे कमाल तापमान १६ डिग्री अंश सेल्सिअस होते तर सांताक्रूझ येथे सर्वाधिक कमी १४.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
(Hindustan Times)राज्यात सध्या वातावरणात चढ उतार अनुभवायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तापमानात घट जाणवत आहे. तर कुठे उष्णता वाढली आहे. तर काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात आज विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईत देखील तापमानात मोठी घट झाली आहे. सकाळी आणि संध्याकाळी तापमानात घट अनुभवायला मिळत आहे. मुंबईचे कमाल तापमान हे १६ डिग्री अंश सेल्सिअस एवढे झाले आहे. सर्वाधिक कमी तापमान हे सांताक्रूझ येथे नोंदवल्या गेले आहेत. सकाळी फिरायला जाणारे नागरिक या गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत.
मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक देखील मॉडरेट अवस्थेत आहे. सध्या मुंबईचा एक्युआय हा १२० एवढा आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या उपाय योजनांमुळे हा हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारला आहे.
राज्यावर सध्या उत्तरेकडून हवा न येण्यामुळे पुढील ७२ तासात किमान तापमानात थोडीशी वाढ होण्याची शक्यता देखील आहे. २५ जानेवारी नंतर तीन ते चार दिवस उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात विदर्भात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील पाच सात दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
(HT)