मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  मुंबई ते रायगड आता फक्त १५ मिनिटांचा प्रवास, जाणून घ्या ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची वैशिष्ट्ये

मुंबई ते रायगड आता फक्त १५ मिनिटांचा प्रवास, जाणून घ्या ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची वैशिष्ट्ये

Jan 11, 2023 11:11 PM IST Shrikant Ashok Londhe
  • twitter
  • twitter

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ९० टक्के काम पूर्ण झाले असून यावर्षी नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग खुला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे मुंबईहून अलिबागला केवळ १५ ते २० मिनिटांत जाणे शक्य होणार आहे. देशातील सर्वात लांबीचा हा सागरी मार्ग ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या पॅकेज २ मधील सर्वात जास्त लांबीच्या म्हणजेच सुमारे १८० मीटर लांबीच्या आणि सुमारे २३०० मेट्रिक टन वजनाच्या ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेकची उभारणी करण्यात आली.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

या सागरी महामार्गामुळे मुंबई ते चिर्ले (अलिबाग) हे अंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. पर्यावरणपूरक असा हा सागरी महामार्ग असून बांधकामातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून त्याचे काम करण्यात आले आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर असून प्रकल्पाची स्थापत्य कामे सुमारे ९० टक्के पूर्ण झाली आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

हा प्रकल्प मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणारा सुमारे २२ किमी लांबीच्या ६ पदरी (३+३ मार्गिका) पूल आहे. या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे १६.५ किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ किमी इतकी आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

या पुलाची रचना ही ६० मीटर लांबीच्या स्पॅनची असून मुख्यतः ते सेगमेंटल बॉक्स गर्डर व कॉक्रिट डेक आहेत. मुंबई पारबंदर प्रकल्पाचे एक प्रमुख वैशिष्ट्य असलेला हा सागरी क्षेत्रातील नॅव्हिगेशन भागातील स्टील डेक आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार राहुल शेवाळे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्रीनिवासन, अतिरिक्त आयुक्त गोविंदराज आदी उपस्थित होते. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार राहुल शेवाळे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्रीनिवासन, अतिरिक्त आयुक्त गोविंदराज आदी उपस्थित होते. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज