मुंबईत गुरुवारी सायंकाळी संततधार पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट झाली असून उकाडा आणि आर्द्रतेपासून दिलासा मिळाला असला तरी वाहतूक कोंडी झाली आहे.
(PTI)रात्री आठ वाजता संपलेल्या १२ तासांच्या कालावधीत शहरात २५.२२ मिलीमीटर, पूर्व उपनगरात ३१.४४ मिलिमीटर आणि पश्चिम भागात २५.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उपनगरीय गाड्या थोड्या उशिराने धावत आहेत, तर काही भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
मान्सूनचे मुंबईत ९ जून रोजी आगमन झाले असले तरी गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
(फोटो - पीटीआय)