मुंबईत मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीसाठी सबवे बंद करण्यात आला आहे.
सायन रोडवर पाणी साचल्याने सायन सर्कल ते सायन स्टेशन सिग्नल दरम्यान नियोजित मार्ग बंद करण्यात आला आहे.
मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सध्याचा एकमेव मार्ग म्हणजे अंधेरी सबवेमध्ये चार ते पाच फुटांपर्यंत पाणी भरले आहे. वाहतूक पोलिसांनी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.