मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा! पुढील दोन दिवसांत जोर वाढणार; हवमान विभागाचा महत्वाचा इशारा

Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा! पुढील दोन दिवसांत जोर वाढणार; हवमान विभागाचा महत्वाचा इशारा

Jul 02, 2024 01:56 PM IST
  • twitter
  • twitter
  • Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी बाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
मुंबईत पुढील पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबईत आज आणि उद्या बुधवारी जोरदार पाऊस होणार असून हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर ४ व ५  जुलै रोजी देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ६ जुलै नंतर मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. 
share
(1 / 7)
मुंबईत पुढील पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबईत आज आणि उद्या बुधवारी जोरदार पाऊस होणार असून हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर ४ व ५  जुलै रोजी देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ६ जुलै नंतर मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. 
मुंबईत मागील दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली होती. पावसाचा जोर शनिवार पासून कमी झाला आहे. दादर, परळ व  मुंबई सेंट्रल भागात सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. 
share
(2 / 7)
मुंबईत मागील दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली होती. पावसाचा जोर शनिवार पासून कमी झाला आहे. दादर, परळ व  मुंबई सेंट्रल भागात सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. (Deepak Salvi )
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 
share
(3 / 7)
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (HT PHOTO)
मुंबईत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगर भागात पावसाची तीव्रता वाढणार असल्याने बाहेर पडतांना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.  
share
(4 / 7)
मुंबईत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगर भागात पावसाची तीव्रता वाढणार असल्याने बाहेर पडतांना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.  (PTI)
मुंबईसह पालघर, ठाणे परिसरात देखील पावसाचा जोर वाढणार आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता असून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 
share
(5 / 7)
मुंबईसह पालघर, ठाणे परिसरात देखील पावसाचा जोर वाढणार आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता असून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Hindustan Times)
पुण्यात मंगळवारी सकाळ पासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. तर घाट विभागात देखील पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे पुण्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान भुशी डॅम घटनेनंतर पर्यटन स्थळी जाताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. 
share
(6 / 7)
पुण्यात मंगळवारी सकाळ पासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. तर घाट विभागात देखील पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे पुण्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान भुशी डॅम घटनेनंतर पर्यटन स्थळी जाताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. (PTI)
पुण्यासह विदर्भात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील पाच दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. 
share
(7 / 7)
पुण्यासह विदर्भात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील पाच दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. (PTI)
इतर गॅलरीज