मुंबई आणि पुण्यामध्येही आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यात आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत रविवारी ३१.९, तर सांताक्रूज येथे ३३.३ डिग्री सेल्सिअस तापमाणाची नोंद झाली.
(ANI)मुंबईत हळू हळू पावसाचा जोर वाढत आहे. उकड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना या पावसाने दिलासा दीला आहे. पुढील तीन टे चार दिवस मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुण्यात देखील काही परिसरात रविवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. पिंपरी चिंचवड परिसरात विक्रमी पाऊस झाला. तासाभरात पडलेल्या या पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली. एका तासात ११४ मिमी पाऊस झाला. दरम्यान आज देखील पुण्यात ढगाळ हवामान राहून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज पुण्यात काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहरसाठी यलो अलर्ट तर पुण्यातील घाट विभागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईसह काही भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या आहेत. मात्र, विदर्भ व मराठवाड्याला आणखी जोरदार पावसाची अपेक्षा आहे.
राज्यात आज कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, छ, संभाजीनगर, जालना, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
(PTI)