
मुंबईसह ठाणे, कल्याण परिसरात आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत अनेक भागांत मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. आयएमडीने आज बुधवारी मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
(HT_PRINT)भारतीय हवामान खात्याने मंगळवारी देखील मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला होता. त्यानुसार मुंबईच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. 'मॅक्सिमम सिटी'च्या अनेक भागांत जोरदार पाऊस जल. सकाळ पासून मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. आज देखील मुंबई, ठाणे, कल्याण, पुण्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५५ किलोमीटर राहणार आहे.
(Deepak Salvi)मुंबईतील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २८ आणि २४ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.
हवामान खात्याने २६ जुलैपर्यंत मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय ठाणे, नंदुरबार, नाशिक, पालघर, अमरावती, अकोला आदी ठिकाणीमंगळवार, २३ जुलै रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
(Hindustan Times)शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस तर, तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अधूनमधून ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमान २८ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता असून २४ अंश सेल्सिअस तापमान राहील' असा अंदाज आयएमडी मुंबईने वर्तवला आहे.
(Hindustan Times)बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक्सवर शेअर केलेल्या हवामान अपडेटमध्ये मुंबईकरांना शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
(Hindustan Times)गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पोलिसांनी नागरिकांना किनारी भाभात जाण्याचे टाळावे असे आवाहन केले आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे आणि खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत १०० नंबरही जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती.
(Deepak Salvi)मुंबईत समुद्र किनारी उंच लाटा उसळण्याचा देखली इशारा देण्यात आला आहे. हाय टाइड १.२९ वाजता येण्याच शक्यता असून तब्बल ४.६९ मीटर। ऊंचीच्या लाटा वाहण्याची शक्यता आहे. तर ओहोटी ७.३८ वाजता येण्याची शक्यता आहे. यावेळी १.३१ मीटर ऊंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. आज हाय टाईड ०१:३० वाजता येणार आहे. यावेळी ४.०७ मीटर ऊंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. तर लो टाइड ही ७.१७ वाजता येण्याची शक्यतय असून ०.४४ मीटर ऊंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे, आहे असे बीएमसीने एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे.
(Deepak Salvi )आयएमडीने महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, बुधवार, २४ जुलै रोजी रायगड रेड अलर्टवर असणार आहे.
(Ashish Vaishnav)कल्याण आणि ठाण्यात उद्या म्हणजेच बुधवारी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
(Hindustan Times)






