
गुजरात टायटन्सकडून दोन वर्षे खेळल्यानंतर हार्दिक पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. आयपीएलच्या सुरुवातीला हार्दिकची मूळ किंमत १० लाख रुपये होती. मात्र, आता त्याची किंमत १५ कोटी रुपये आहे. हार्दिकला गुजरातमधून मुंबईत आणण्यासाठी अंबानी कुटुंबाने १५ कोटी रुपये दिले. अहवालात असे म्हटले आहे की, हा व्यापार करण्यासाठी मोठा खर्च येतो.
(Mumbai Indians-X)आयपीएल फ्रँचायझींनी रिटेन्शन लिस्ट जाहीर केली, तेव्हा हार्दिक पांड्या गुजरात संघात कायम होता. तथापि, काही तासांनंतर तो संघ बदलला आणि मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. ट्रेडिंग विंडो खुली असल्याने रिटेन्शन लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतरही हा बदल शक्य झाला.
(Hardik Pandya-X)मुंबईने हार्दिकवर केवळ १५ कोटी रुपये खर्च केले. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालात म्हटले आहे की, हार्दिक पांड्याला संघात सामील करण्यासाठी मुंबई इंडियन्सला १०० कोटी इतका खर्च आल्याचे सांगितले जात आहेत.
(PTI)गुजरात टायटन्स संघ सीव्हीसी कॅपिटल्स नावाच्या कंपनीच्या मालकीचा आहे. त्यांनी गुंतवणूक म्हणून आयपीएल संघ विकत घेतला. सीव्हीसीने गुजरातचा संघ ५ हजार ६२५ कोटींना विकत घेतला. हार्दिकला मुंबईत पाठवून कंपनीने मोठी रक्कम खिशात घातली. या आकडेवारीबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, हार्दिकची ट्रान्सफर फी १०० कोटी रुपये असल्याचे अहवालात म्हटले आहे.
(PTI)हार्दिकला एमआयला विकून सीव्हीसी कॅपिटलला त्याच्या लिलावात १५ कोटी रुपये मिळाले. आयपीएल मधून प्रचंड ट्रान्सफर फी देखील मिळाली, जी सुमारे १०० कोटींच्या जवळपास आहे.
(PTI)


