(4 / 7)एसटीच्या ताफ्यात नवीन बसचा समावेश ऑक्टोबर महिन्यापासून होण्याची शक्यता आहे. या बस टु बाय टू आसनी असून एका बसचा अंदाजित खर्च ३८.२६ लाख रुपये असणार आहे. या बस आधुनिक असणार असून CMVR स्टॅंडर्डच्या असणार आहेत. या बसची बॉडी AIS १५३ असणार असून या BS VI स्टॅंडर्डच्या असणार आहेत. या बसला १९७ एचपी – एच सिरिजचे इंजिन आहे. या बस रिअर एअर सस्पेन्शनसह अन्य सुविधा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहेत.