मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL Records : धोनी ते कोहली… हे ७ खेळाडू पहिल्या सीझनपासून गाजवतायत आयपीएल, पाहा

IPL Records : धोनी ते कोहली… हे ७ खेळाडू पहिल्या सीझनपासून गाजवतायत आयपीएल, पाहा

May 09, 2023 04:53 PM IST Rohit Bibhishan Jetnavare

  • ipl players with most ipl season played : आयपीएल 2023 मध्ये ७ खेळाडू असे आहेत, जे २००८ पासून म्हणजेच आयपीएलच्या मोसमापासून या स्पर्धेचा भाग आहेत.

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएलच्या पहिल्या सीझनपासून ही स्पर्धा खेळत आहे. २००८ ते २०१५ पर्यंत तो चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. जेव्हा CSK वर बंदी घालण्यात आली तेव्हा धोनीने २०१६ आणि २०१७ चा हंगाम रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला होता. नंतर २०१८ पासून तो पुन्हा CSK मध्ये सामील झाला. धोनीने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत २४४ सामने खेळले आहेत आणि ५०५४ धावा केल्या आहेत. तसेच त्याने विकेटच्या मागे १८२ बळी घेतले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकही पहिल्या आयपीएलपासून आतापर्यंत सक्रिय आहे. या १६ वर्षांत तो ६ संघांचा भाग राहिला आहे. तो दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या जर्सीमध्ये दिसला आहे. कार्तिकने आतापर्यंत २३९ आयपीएल सामने खेळले असून ४४८६ धावा केल्या आहेत. कार्तिकचे विकेटमागे १७७ बळी आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

टीम इंडियाचा आणखी एक यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा देखील या पहिल्या सीझनपासून आयपीएलचा भाग आहे. साहा IPL 2008 मध्ये KKR चा भाग होता. यानंतर तो CSK, Kings-11 पंजाब आणि SRH चाही भाग बनला. सध्या तो गुजरात टायटन्सच्या वतीने धडाकेबाज खेळ करत आहे. साहाने १५५ आयपीएल सामन्यांमध्ये २७०० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने विकेटच्या मागे १०७ बळीही घेतले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

गब्बर म्हणजेच शिखर धवन हादेखील पहिल्या सीझनपासून आयपीएल खेळत आहे. शिखरने १६ वर्षांत ६ वेगवेगळ्या फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व केले आहे. शिखरने एकूण २१३ आयपीएल सामने खेळले असून ६५३६ धावा केल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

मनीष पांडे आयपीएलच्या पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्सचा भाग होता. यानंतर तो आणखी ६ फ्रँचायझींमध्ये सामील झाला. मनीषने आयपीएलमध्ये १६८ सामने खेळले आहेत. त्याने एकूण ३७८१ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय होण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

रोहित शर्मा पहिल्या तीन आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स हैदराबादचा भाग होता. यानंतर २०११ पासून ते आतापर्यंत मुंबई इंडियन्सशी जोडला गेला आहे. रोहितने आतापर्यंत २३७ आयपीएल सामन्यांमध्ये ६०६३ धावा केल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

विराट कोहली हा आयपीएलच्या पहिल्या सीझनपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग आहे. त्याने २३३ आयपीएल सामन्यांमध्ये ७०४३ धावा केल्या आहेत. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. मात्र, विराटच्या आरसीबीला आतापर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी मिळालेली नाही.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

ipl players with most ipl season played
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

ipl players with most ipl season played(photos- IPLT20.COM)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज