मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Har Ghar Tiranga: ‘भाग्य है मेरा मैं एक भारतीय हूं’, धोनीनं बदलला डीपी

Har Ghar Tiranga: ‘भाग्य है मेरा मैं एक भारतीय हूं’, धोनीनं बदलला डीपी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 13, 2022 12:44 PM IST

MS Dhoni Har Ghar Tiranga: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही हर घर तिरंगा या मोहिमेत सहभागी झाला आहे. धोनीने आपल्या सोशल मीडियावरील प्रोफाइल पिक्चर चेंज केला आहे. आता त्याने भारताचा तिरंगा हा डीपी ठेवला आहे. सोशल मीडियावर खूपच कमी सक्रिय असणाऱ्या धोनीने या खास प्रसंगी डीपी बदलला आहे.

MS Dhoni
MS Dhoni

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. भारत सरकारच्या आवाहनावर प्रत्येक घराघरात तिरंगा मोहीम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत देशवासीय तिरंग्याचे छायाचित्र आपल्या प्रोफाइल फोटोवर लावत आहेत. आता टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा देखील या मोहिनेत सामील झाला आहे.

एमएस धोनीने शुक्रवारी इंस्टाग्रामवर त्याचे प्रोफाइल फोटो बदलला आहे. माहीने सर्व प्रकारच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर तिरंग्याचा डीपी लावला आहे. तसेच, त्याने एक खास संदेशही लिहिला आहे. "भाग्य माझे आहे, मी एक भारतीय आहे" असे लिहिले आहे.

महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर खूपच कमी सक्रिय असतो. धोनी खूपच कमी वेळा फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर काहीतरी पोस्ट करत असतो. परंतु हर घर तिरंगा या विशेष मोहिमेत त्याने भाग घेतला आहे.

हर घर तिरंगा मोहिमेत महेंद्रसिंग धोनीशिवाय इतर अनेक क्रिकेटपटूही सहभागी आहेत. माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यानेही आपल्या घरी तिरंगा फडकावला आहे. त्याचबरोबर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या मोहिमेत चाहत्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

१५ ऑगस्ट रोजीच धोनीने घेतली होती निवृत्ती

एमएस धोनीचे १५ ऑगस्टशीही खास नाते आहे. एमएस धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. त्यादिवशी धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली होती.

 

 

WhatsApp channel