Virender Sehwag On MS Dhoni : सीएसकेच्या गोलंदाजांनी प्रत्येक सामन्यात अतिरिक्त धावा दिल्यामुळं विरेंद्र सेहवागने संताप व्यक्त केला आहे.
(1 / 5)
Virender Sehwag On MS Dhoni : यंदाचा आयपीएल हंगाम सुरू झाल्यापासून चेन्नई सुपरकिंग्जचे अनेक गोलंदाजांनी अतिरिक्त धावा दिल्यामुळं सीएसकेवर टीका केली जात आहे.(Chennai Super Kings Twitter)
(2 / 5)
Virender Sehwag On Dhoni : सीएसकेचे गोलंदाज सातत्याने अतिरिक्त धावा देणार असतील तर त्यांना दुसऱ्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळावं लागणार असल्याचा सज्जड इशारा धोनीने सीएसकेच्या गोलंदाजांना दिला होता.(PTI)
(3 / 5)
परंतु आता सीएसकेच्या गोलंदाजांच्या सुमार कामगिरीवर भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने संताप व्यक्त केला आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात धोनी आनंदात दिसत नव्हता, असं सेहवागने म्हटलं आहे.(AP)
(4 / 5)
सीएसकेने वाइड्स आणि नो बॉल कमी करण्याची गरज असल्याचं धोनीने अनेकदा म्हटलं आहे. परंतु तरीही गोलंदाज सुधारत नसतील तर ते योग्य नसल्याचं सेहवाग म्हणाला.(AP)
(5 / 5)
गोलंदाज सुधारणार नसतील तर चेन्नई सुपरकिंग्ज महेंद्रसिंह धोनीवर बंदी घालण्याच्या परिस्थितीत घेऊन जाऊ शकतात, असंही विरेंद्र सेहवागने म्हटलं आहे.(AP)