
‘कल्की २८९८ एडी’मध्ये अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने ‘गिनी’ची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या सुरुवातीलाच मृणालच्या व्यक्तिरेखेची एन्ट्री होते. तिने छोट्याशा भूमिकेतही प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे.
‘कल्की २८९८ एडी’मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका करण्यासाठी मृणालने कोणतेही मानधन घेतले नसल्याचे बोलले जाते. असे म्हटले जाते की, मृणालने वैजयंती मुव्हीज बॅनरवरील प्रेमामुळे या चित्रपटात काम केले आहे, या बॅनरने तिला ‘सीता रामम’ सारखा तेलुगूमधील पहिला ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिला होता.
मृणाल ठाकूरने वैजयंती मुव्हीजच्या बॅनरखाली तयार झालेल्या 'सीतारामम' या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. दुलकर सलमानसोबतची तिची ही सुंदर लव्हस्टोरी प्रचंड हिट झाली होती.
‘सीतारामम’ या चित्रपटाव्यतिरिक्त मृणाल ठाकूरने ‘हाय नन्ना’ आणि ‘द फॅमिली स्टार’सारख्या तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने प्रत्येक भूमिकेत स्वतःची वेगळी छाप सोडली आहे. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.


