राजा: १९९३मध्ये आलेल्या ‘क्षत्रिय’ या चित्रपटात राजाची भूमिका साकारणाऱ्या घोड्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले होते. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला त्यातील राजाची व्यक्तिरेखा नक्कीच आठवेल. चित्रपटात हा घोडा नायकाचा चांगला मित्र होता.
टफी: १९९१मध्ये आलेल्या 'हम आपके है कौन' या चित्रपटातील टफीला कोण विसरू शकेल. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या प्रजातीच्या कुत्र्यांची विक्री वाढली होती. टफीने चित्रपटात अप्रतिम काम केले होते.
एंटरटेनमेंट: एका गोंडस गोल्डन रिट्रीव्हर कुत्र्याने अक्षय कुमारच्या ‘इट्स एंटरटेनमेंट’ या चित्रपटात सर्वांना खूप हसवले होते. या चित्रपटाची कथा एका अशा मुलाची होती, ज्याचे हिरे व्यापारी वडील कुत्र्याच्या नावावर सगळी संपत्ती करतात. या कुत्र्याचे नाव एंटरटेनमेंट आहे.
मोती: १९८५मध्ये रिलीज झालेल्या 'तेरी मेहेरबनियां' या चित्रपटातील मोतीने सर्वांनाच भावूक केले होते. जॅकी श्रॉफ स्टारर चित्रपटात या काळ्या रंगाच्या लॅब्राडोरचा अभिनय विसरणे खरोखरच अशक्य आहे.
७७७ चार्ली: २०२२ साली प्रदर्शित झालेल्या '७७७ चार्ली' या चित्रपटाचा चार्ली तुम्हाला अनेकदा हसवतो आणि रडवतो. एक कुत्रा जो त्याच्या मालकावर खूप प्रेम करतो आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला एकटे सोडत नाही, अशी या चित्रपटाची कथा आहे.