मदर्स डे जवळ आला आहे. यंदाचा मदर्स डे रविवार, १२ मे रोजी आहे. आणि हा खास दिवस तुमच्या आईसाठी कसा खास बनवायचा हा प्रश्न पडला असेल तर या ६ मार्गांवर एक नजर टाका.
कुकिंग: या दिवशी तुम्ही तुमच्या आईचे आवडते पदार्थ बनवू शकता. तुम्ही एखादा पदार्थ आईसोबत मिळून बनवू शकता. किंवा त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवून त्यांना सरप्राईज देऊ शकता.
चित्रपट: तुमच्या आईला सिनेमे बघायला आवडतात का? मग पॉपकॉर्न, कोल्ड ड्रिंक्स सोबत मस्त दुपार घरी घालवण्याची व्यवस्था करा. नाहीतर सिनेमाची तिकिटे काढून आईसोबत मुव्ही पहायला जा.
होम स्पा: आईसाठी तुम्ही घरीच स्पाची व्यवस्था करू शकता. यामुळे आईला रोजच्या कामातून ब्रेक मिळेल. तिचा थकवा जाईल आणि ती रिलॅक्स होईल.
ट्रिप: जर तुमच्या आईला प्रवासाची आवड असेल तर तुम्ही आईसोबत जवळपासच्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. तुम्ही वन डे ट्रीप प्लॅन करू शकता. यातून तुमच्या आईला रोजच्या रुटीनमधून ब्रेक मिळेल आणि बरे वाटेल.
हस्तकला: तुम्ही आईसोबत मिळून कोणतेही हस्तकला करू शकता. यामुळे तुम्ही एकमेकांसोबत वेळ घालवाल. तसेच तुम्ही काही हॅन्डक्राफ्ट गिफ्ट आईला देऊ शकता.