वनडे विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट्स- मोहम्मद शमी हा एकदिवसीय विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांना मागे टाकून शमीने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात ही कामगिरी केली होती.
शमीने भारतासाठी १८ विश्वचषक सामने खेळताना ५५ बळी घेतले आहेत. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. शमीने केवळ ७ सामन्यात २४ विकेट घेतल्या होत्या.
शमीने २०१५ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी १७ विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने १४ विकेट घेतल्या. त्यानंतर २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने २४ विकेट्स घेऊन वादळ निर्माण केले. या स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीत शमीने ७ विकेट्स घेतल्या होत्या.
शमीने २०१९ विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती. एकदिवसीय विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा तो दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला.
शमीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द- मोहम्द शमी हा भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळणारा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ६४ कसोटी, १०१ एकदिवसीय आणि २३ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.