हिंदी चित्रपटांनी नेटफ्लिक्सवर धमाका केला आहे. या वर्षी प्रीमियर झालेले ९ चित्रपट लाखो आणि करोडो वेळा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहिले गेले आहेत. विशेष म्हणजे या यादीतील सर्वात कमी बजेटच्या चित्रपटाला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेला हिंदी चित्रपट म्हणजे ‘लापता लेडीज’. आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण राव यांनी केले आहे. सर्वात कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट सर्वाधिक वेळा पाहिला गेला आहे. या चित्रपटाला नेटफ्लिक्सवर १.७१ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.
अजय देवगणचा मिस्ट्री हॉरर चित्रपट शैतान' देखील नेटफ्लिक्सवर कमाल करत आहे. काळी जादू आणि वशिकरण यांसारख्या विषयांवर भाष्य करणारा हा चित्रपट १.४८ कोटी वेळा पाहिला गेला आहे. या चित्रपटात आर माधवनची भूमिका पसंत केली गेली आहे.
करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉनच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कपिल शर्मा, दिलजीत दोसांझ सारखे कलाकारही या चित्रपटात दिसले आहेत. ‘क्रू’ला नेटफ्लिक्सवर १४.३ दशलक्ष वेळा पाहिले गेले आहे.
रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट २०२३च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये गणला जातो. बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही या चित्रपटाला पसंती मिळाली. रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी स्टारर या चित्रपटाला नेटफ्लिक्सवर १.३६ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.
शाहरुख खानच्या ‘डंकी’ने थिएटरमध्ये चांगली कामगिरी केली नाही. पण, नेटफ्लिक्सवर प्रीमियर झाल्यानंतर हा चित्रपट १.०८ कोटी वेळा पाहिला गेला. या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत होती, तर विकी कौशलची छोटी भूमिका होती. हा चित्रपट फारसा छाप पाडू शकला नाही.
हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा देशभक्तीपर चित्रपट ‘फायटर’ यावर्षी २६ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने चांगली कामगिरी केली आणि नंतर नेटफ्लिक्सवरही धमाका केला. हा चित्रपट १.०४ कोटी वेळा पाहिला गेला.
या यादीत भूमी पेडणेकरच्या ‘भक्षक’ चित्रपटाचाही समावेश आहे. हा चित्रपट १ कोटीहून अधिक लोकांनी पाहिला आणि त्यांना आवडला आहे. ‘भक्षक’ची कथा बिहारमधील मुझफ्फरनगर येथे घडलेल्या मुलींच्या गायब होण्याच्या घटनेवर आधारित होती. समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले.
मल्टी-स्टारर चित्रपट ‘मर्डर मुबारक’ला समीक्षकांकडून फारशी प्रशंसा मिळू शकली नाही. परंतु, ओटीटीवर त्याला चांगले व्ह्यूज मिळाले आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ६३ लाखांनी पाहिला आहे. या चित्रपटात सारा अली खान, करिश्मा कपूर, डिंपल कपाडिया, संजय कपूर, विजय वर्मा आणि पंकज त्रिपाठी यांसारखे दिग्गज कलाकार होते.
यामी गौतमचा चित्रपट ‘आर्टिकल ३७०’ देखील अनेक चित्रपटांना मागे टाकत या यादीत पुढे आला आहे. या चित्रपटाला नेटफ्लिक्सवर ५८लाख व्ह्यूज मिळाले, जे अनेक बड्या स्टार्सच्या चित्रपटांपेक्षा चांगले आहेत.