२०२४ हे वर्ष आता संपायला आले आहे. दरम्यान गुगलने भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या चित्रपट आणि टीव्ही शोची यादी जाहीर केली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की पाकिस्तानातही भारतीय चित्रपट आणि टीव्ही शोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चला जाणून घेऊया २०२४ वर्षात पाकिस्तानमध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपट आणि टीव्ही शोची यादी…
संजय लीला भन्साळी यांची वेब सीरिज 'हिरामंडी' पाकिस्तानमध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेली वेब सीरिज आहे. या सीरिजला भारतातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि पाकिस्तानमध्ये ही सीरिज सर्वात जास्त सर्च केली गेली.
विक्रांत मेसीचा '१२ वी फेल' हा सिनेमा पाकिस्तानमधील सर्वाधिक गुगल सर्च केलेल्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा ॲक्शन, थ्रिलर सिनेमा 'ॲनिमल' हा पाकिस्तानमध्ये सर्वाधिक सर्च झालेला सिनेमा आहे. हा सिनेमा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कालिन भैया आणि गुड्डू पंडित यांची जादू केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानवरही पाहायला मिळाली. ॲमेझॉन प्राइमच्या या सुपरहिट मालिकेला पाकिस्तानमध्येही मोठ्या प्रमाणावर गुगल केले गेले
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा 'स्त्री-2' हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानमध्येही खूप सर्च केला गेला. २०२४मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या शोच्या यादीत या चित्रपटाला ५वे स्थान मिळाले आहे.