राजस्थान रॉयल्स संघ हा सामना हरला असला तरी त्यांचा स्टार फलंदाज रियान परागने आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली. या सामन्यात त्याने शानदार खेळी खेळली. परागने अवघ्या ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने ४८ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ८ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याच्या या खेळीच्या जोरावर परागने ऑरेंज कॅपच्या यादीत मोठी झेप घेतली आहे.
रियान परागच्या नावावर १० सामन्यांच्या ९ डावात ४०९ धावा झाल्या आहेत. या मोसमात त्याने आतापर्यंत ५८.४३ च्या सरासरीने आणि १५९.१४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. या मोसमात ४००+ धावा करणारा पराग हा पहिला अनकॅप्ड भारतीय खेळाडू ठरला आहे. तो आता अँडर कॅपच्या यादीत चौथ्या स्थानावर आला आहे.
सामन्यापूर्वी तो केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या मागे होता, पण आता तो या दोघांच्याही पुढे गेला आहे. ऑरेंज कॅपचा शर्यतीत लोकेश राहुल रियान परागच्या मागे पाचव्या स्थानावर आहे. लखनौचा कर्णधाराने आतापर्यंत १० डावात ३ अर्धशतकांसह एकूण ४०६ धावा केल्या आहेत.
आयपीएल २०२४ ची ऑरेंज कॅप सध्या सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्याकडे आहे. त्याने कोहलीला मागे टाकले आहे. ऋतुराजने १० डावात एकूण ५०९ धावा केल्या आहेत. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत १ शतक आणि ४ अर्धशतके झळकावली आहेत. ऋतुराज वगळता केवळ विराट कोहलीनेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत ५०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
यानंतर विराट कोहली हा सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. आरसीबीसाठी त्याने १० डावात एकूण ५०० धावा केल्या आहेत. विराटने १ शतक आणि ४ अर्धशतकं झळकावली आहेत. गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन किंवा यदित तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १० दावत ४१८ धावा केल्या आहेत.