योग आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे. शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी योगासने केली पाहिजेत. मात्र काही लोक ते करताना काही चुका करतात. जाणून घ्या योगासनादरम्यान होणाऱ्या कॉमन चुका.
योगा करण्यासाठी योग्य कपडे निवडणे आवश्यक आहे. जर तुमचे कपडे खूप टाइट, घट्ट किंवा कमी घाम शोषणारे असतील तर तुमचे मन कपडे दुरुस्त करण्यावर असेल. लक्षात ठेवा की सरल आसन करण्यासाठी लूज फिटिंगवाले, ढगळ कपडे आवश्यक आहेत. त्याच वेळी कठीण योगासाठी स्ट्रेच आणि सपोर्ट देणारे कपडे घातले पाहिजे.
योगासने करताना शरीरातून भरपूर घाम येतो. अशा स्थितीत ते योगा मॅटवर देखील लागते. त्यामुळे मॅच स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. असे न केल्यास मॅट गुळगुळीत होते आणि आसने करण्यात अडचण येते. काही वेळा मॅटमधून घाणेरडा वासही येऊ लागतो.
योगासने करण्यासाठी पोट रिकामे असणे आवश्यक आहे. जर तुम्ही काही खाल्ल्यानंतर योगासन केले तर ते तुमचे नुकसान करू शकते. या व्यतिरिक्त, तुम्हाला सुस्त वाटू शकते आणि योग करणे कठीण होऊ शकते. योगा करण्याच्या १ किंवा २ तास आधी तुम्ही हलका नाश्ता घेऊ शकता.
योगादरम्यान संथ आणि खोल श्वास घेण्यास सांगितले जाते. कारण योगामध्ये श्वासोच्छवासाच्या पद्धतीमध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. सरावानंतर हे शक्य होते. जरी काही लोक या काळात श्वास रोखून धरतात जे चुकीचे आहे.
योगासन करताना बहुतेक लोक मोबाईल सोबत ठेवतात. योग आपल्याला लक्ष एकाग्र करण्यास मदत करतो. पण तिथेही मोबाईल ठेवून योगासने केली, तर लक्ष विचलित होऊ शकते. अशा वेळी योगासन करताना फोन दूर ठेवा, सायलेंटवर ठेवा.