बॉलीवूड स्टार्सच्या लग्नात किती पैसे खर्च होतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? डेस्टिनेशन वेडिंग ही एक अतिशय फॅन्सी टर्म वाटते, परंतु दुर्गम आणि आलिशान ठिकाणी अनेक पाहुण्यांना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी सजावट आणि इव्हेंट मॅनेजमेंटवर मोठा खर्च करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया बॉलिवूडच्या काही महागड्या लग्नांबद्दल.
सर्वप्रथम दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाबद्दल बोलूया. या बॉलीवूड लग्नाची खूप चर्चा झाली आणि त्याचे फोटोही इंटरनेटवर व्हायरल झाले. पण तुम्हाला माहिती आहे का की, इटलीतील या आलिशान लग्नात एकूण ७७ कोटी रुपये खर्च आला होता.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाह भारतात झाला, पण वेगवेगळ्या विधींनी. दोघांचे फोटो व्हायरल झाले होते. एका रिपोर्टनुसार, त्यांच्या लग्नावर एकूण ४५ कोटी रुपये खर्च झाला होता.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या लग्नाची गणना इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या लग्नांमध्ये केली जाते. इटलीतील एका आलिशान बेटावर झालेल्या या स्वप्नवत लग्नाची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न मुंबईतच पार पडले. 2007 मध्ये या प्रतिष्ठित कुटुंबाच्या लग्नावर बच्चन कुटुंबानी केवळ ६ कोटी रुपयांचा खर्च केला होता.
करीना कपूर आणि सैफ अली खान यांची गणना बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल्समध्ये केली जाते. प्रदीर्घ रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केले आणि मुंबईत या लग्नावर सुमारे १० कोटी रुपये खर्च झाले.