
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात दमदार शतक झळकावले आहे. यासह त्याने सचिन तेंडुलकरच्या ४९ एकदिवसीय शतकांची बरोबरी केली आहे. याशिवाय, विराट कोहलीने अनेक विक्रम रचले आहेत. कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा १००० धावांचा टप्पा गाठणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी पोहोचला आहे.
(ICC X)एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच वर्षात सर्वाधिक १ हजार किंवा त्यापेक्षा धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानावर आहे. सचिनने सात वेळा १००० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
(BCCI Twitter)श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकाराने एकदिवसीय क्रिकेटच्या कॅलेंडर वर्षात सहा वेळा १००० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. पाँटिंगने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहा वेळा १००० हून अधिक धावा केल्या आहेत.


