मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mosquito Home Remedies: डासांनी हैराण झालात? ‘हे’ घरगुती हॅक्स नक्की ट्राय करू बघा! लगेच मिळेल आराम

Mosquito Home Remedies: डासांनी हैराण झालात? ‘हे’ घरगुती हॅक्स नक्की ट्राय करू बघा! लगेच मिळेल आराम

May 15, 2024 07:14 PM IST Harshada Bhirvandekar

Mosquito Home Remedies: डासांमुळे हैराण झाला असाल, तर हे घरगुती उपाय तुमची समस्या कमी करू शकतात. डासांपासून बचावासाठीचे हे सर्व उपाय तुमच्या स्वयंपाकघरात अगदी सहज तयार करता येतात.

सध्या सगळीकडेच डासांचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. डास चावल्यामुळे डेंग्यू, मलेरिया, हिवताप यांसारखे प्राणघातक आजार पसरतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी लोक डास दूर पळवणाऱ्या कॉइल, लिक्विड किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या अगरबत्त्या वापरतात. परंतु, अनेक वेळा ही सर्व डासांपासून बचाव करणारी रसायने डासांवर तितकीशी प्रभावी नसली, तरी तुमचे आरोग्य नक्कीच खराब करतात.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

याच्या अतिवापरामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो आणि तुम्ही आजारी पडू शकता. जर, तुम्हीही डासांमुळे हैराण झाला असाल, तर हे घरगुती उपाय तुमची समस्या कमी करू शकतात. विशेष म्हणजे डासांपासून बचावासाठीचे हे सर्व उपाय तुमच्या स्वयंपाकघरात अगदी सहज तयार करता येतात.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

कांदा: डासांपासून सुटका मिळवण्यासाठी कांद्याचा वरचा भाग चाकूच्या मदतीने थोडासा कापून घ्या. आता कांद्याला आतून थोडा पोकळ करा आणि त्यात कापसाची वात घाला. यानंतर कांद्यामध्ये एक चमचा मोहरीचे तेल घालून त्याचा दिवा तयार करा. हा कांद्याचा दिवा तुम्ही घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवू शकता. कांद्याचा वास डासांना तुमच्या घरात शिरण्यापासून रोखेल.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

लिंबू: डासांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही लिंबाचा उपायही वापरून पाहू शकता. हा उपाय करण्यासाठी, लिंबाचा तुकडा घ्या आणि त्यात काही लवंगा अडकवा. हा लवंगा अडकवलेला लिंबू घराच्या कोपऱ्यात किंवा दाराजवळ ठेवा. असे केल्याने डासांचे प्रमाण कमी होईल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

कडुलिंब: कडुलिंबाच्या पानांच्या मदतीने डासांपासूनही सुटका मिळते. हा उपाय करण्यासाठी, एक मातीचे भांडे घ्या. त्यात मूठभर कोरडी कडुलिंबाची पाने, ४-५ लवंगा, दोन चमचे मोहरीचे तेल, दोन ते तीन तमालपत्र आणि काही कापूरचे तुकडे घालून ते जाळा. या धुरामुळे डास घरातून दूर पळतील.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

लसूण: तुमच्या घरापासून डासांना दूर ठेवण्यासाठी लसूणही मदत करू शकते. लसणाचा हा उपाय वापरण्यासाठी प्रथम लसणाच्या दोन ते चार पाकळ्या हलक्या ठेचून पाण्यात उकळा. आता हे पाणी थंड करून स्प्रे बाटलीत साठवा. संध्याकाळी हे पाणी घराच्या कोपऱ्यांमध्ये फवारा. असे केल्याने डासांपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

लसूण: तुमच्या घरापासून डासांना दूर ठेवण्यासाठी लसूणही मदत करू शकते. लसणाचा हा उपाय वापरण्यासाठी प्रथम लसणाच्या दोन ते चार पाकळ्या हलक्या ठेचून पाण्यात उकळा. आता हे पाणी थंड करून स्प्रे बाटलीत साठवा. संध्याकाळी हे पाणी घराच्या कोपऱ्यांमध्ये फवारा. असे केल्याने डासांपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज