(3 / 8)जोरदार वाऱ्याने हायटेंशन वीज वाहिनीच्या तारा एकमेकांना घासल्या. यामुळे आगीचे लोळ खाली पडून एका झाडाला आग लागली. यावेळी हवेचा वेग जास्त असल्याने हळू हळू आगीने भीषण रूप धारण केले. या आगीमुळे एका घराला देखील भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांना या जळालेल्या घरात दुपारी एक मृतदेह आढळून आला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आग विझवणे अग्निशमन दलाला कठीण झाले होते, मात्र पाऊस आल्याने ही आग आटोक्यात आली. (AP)