पावसाळा सुरू झाला आहे. हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम होतो. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
हवामान बदलताच सर्दी-खोकला सुरू होईल. खोकला बॅक्टेरिया किंवा व्हायरल इन्फेक्शन किंवा एलर्जीमुळे देखील होऊ शकतो. पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणं खूप गरजेचं आहे. रोगप्रतिकार शक्ती मजबूत असेल तर तुम्ही आजारातून लवकर बरे होऊ शकता. काही आयुर्वेदिक पदार्थ सर्दी आणि खोकल्याची समस्या कमी करू शकतात.
आले: अनेक जण आल्याचा चहा पितात. आलं आरोग्यासाठी खूप चांगलं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आल्यामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. आल्याचा चहा प्यायल्याने खोकला आणि सर्दी बरा होतो.
हळद: हवामान बदलामुळे होणारी सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल तर निरोगी राहण्यासाठी आणि या सामान्य आजारांपासून आराम मिळवण्यासाठी हळदीचे दूध प्या. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. हे संसर्गापासून बचाव करते.