बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची प्रेयसी लिन लैशरामने २९ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली. मणिपूरमधील इंफाळ येथील मंदिरात पारंपरिक मणिपुरी पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा पार पडला. आता मुंबईत परतल्यावर रणदीपने रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. चला पाहूया कोणते कलाकार हजर होते.
अभिनेत्री तमन्ना भाटीया आणि विजय वर्मा रिसेप्शनला हजर होते. या पार्टीतील लिन आणि तमन्नाचा भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे.