बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण ही सध्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. तिचे परदेशातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
(1 / 5)
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच आई होणार आहे. सध्या ती स्वत:ला वेळ देण्यासाठी पती रणवीर सिंगसोबत सुट्टीवर गेली आहे. फिरतानाचे परदेशातील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, ती नेमकी कुठे आहे हे अद्याप सांगितलेले नाही.
(2 / 5)
अभिनेता रणवीर सिंगने दीपिकाचा हा फोटो क्लिक केला आहे. या फोटोमध्ये तिने स्विमिंग स्वूट आणि पांढरा शर्ट घातला आहे.
(3 / 5)
एका धबधब्याखाली दीपिका आणि रणवीर एकत्र वेळ घालवत असल्याचे या फोटोवरुन स्पष्ट होत आहे.
(4 / 5)
दीपिका आणि रणबीर हे अॅम्सर्टडॅमला गेले असतानाचा फोटो आहे. त्यांनी जगप्रसिद्ध असलेल्या या पुलावर फोटो काढून पोस्ट केला आहे.
(5 / 5)
हा देखील दीपिकाचा सुट्ट्यांचा आनंद घेतानाचा फोटो आहे. सध्या तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.