मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी या शुभ योग-संयोगात, जाणून घ्या यश प्राप्तीसाठी काय करावे आणि वाचा कथा

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी या शुभ योग-संयोगात, जाणून घ्या यश प्राप्तीसाठी काय करावे आणि वाचा कथा

May 19, 2024 09:57 AM IST
  • twitter
  • twitter
Mohini Ekadashi 2024 : आज १९ मे २०२४ रोजी, वैशाख शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. या मोहिनी एकादशी तिथीला काय करावे आणि एकादशीची कथा काय आहे ते जाणून घ्या.
आज मोहिनी एकादशी असून ही वैशाख शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे, यादिवशी शास्त्रानुसार अनेक विधी पाळले जातात. त्यामुळे ही मोहिनी एकादशी धार्मिक महत्त्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. यंदा मोहिनी एकादशीला सर्वार्थ सिद्धी योग, लक्ष्मीनारायण योग, शुक्रादित्य योग जुळून आले आहेत. बघूया ही एकादशी तिथी किती कशी खास होईल.
share
(1 / 5)

मोहिनी एकादशी- मोहिनी एकादशीची तिथी १८ मे रोजी सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी सुरू झाली आहे आणि १९ मे रोजी दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी संपेल. उदया तिथीनुसार मोहिनी एकादशीचे व्रत आज १९ मे रोजी पाळले जात आहे.
share
(2 / 5)

मोहिनी एकादशीचे माहात्म्य- मोहिनी एकादशीचा दिवस खास भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी आहे असे म्हटले जाते. या शुभ दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. या मोहिनी एकादशीची कथा पुराणात सांगितली आहे.
share
(3 / 5)

मोहिनी एकादशीची कथा - असे म्हटले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी श्री विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले. त्या रूपाने त्याने देवांना अमृत पाजले. असुरांचा होणारा त्रास दूर करण्यासाठी श्रीविष्णूने हे रूप धारण केले. यामुळे देवांना अमृत प्राप्त झाले. हिंदू धर्मात एकादशीचा उपवास भगवान विष्णूला समर्पित केला गेला आहे.
share
(4 / 5)

मोहिनी एकादशीला काय करावे- जर तुम्ही आर्थिक संकटाने त्रस्त असाल तर मोहिनी एकादशीला तुळशीची माळ करून नारायणाला अर्पण करा. नारायणाचा आशीर्वाद असल्यास आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. या एकादशी तिथीला तुम्ही पूजा करताना नारायणाला तुळशी अर्पण करू शकता. त्यातून यशासह सुख समृद्धी मिळते. 
share
(5 / 5)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज