International Hospital Aurangabad: रुग्णांकडे डॉक्टर लक्ष देत नसल्याचा आरोप करत जमावानं औरंगाबादेतील इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.
(1 / 5)
International Hospital Aurangabad : रुग्णांकडे डॉक्टर लक्ष देत नसल्याचा आरोप करत जमावानं औरंगाबादेतील इंटरनॅशनल हॉस्पिटल फोडलं आहे.(HT)
(2 / 5)
रुग्णालयात अनेक रुग्ण उपचार घेत असून त्यांच्याकडे डॉक्टर लक्ष देत नसल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली आहे. त्यामुळं परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.(HT)
(3 / 5)
संतापलेल्या नागरिकांनी रुग्णालयात तोडफोड केल्यानंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती. यावेळी आक्रमक जमावानं प्रशासनावर रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचा आरोप केला.(HT)
(4 / 5)
संतप्त जमावानं रुग्णालयातील डॉक्टरांचं ऑफिस, फर्निचर आणि केबिनच्या काचा फोडल्या आहेत. या तोडफोडीत रुग्णालयाच्या संपत्तीचं मोठं नुकसान झालं आहे.(HT)
(5 / 5)
या घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यानंतर आता स्थिती नियंत्रणात असून काही लोकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.(HT)